महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता तुम्ही ६ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह अर्ज भरु शकतात. तर २० ते ३० नोव्हेंबरपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येईल.
राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी ही माहिती दिली आहे. याचसोबत प्रसिद्धपत्रक जाहीर करण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज सरल प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम घेणारे विद्यार्थी, खासगी विद्यार्थी, पुनर्परीक्षा देणारे विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयातर्फे अर्ज भरायचे आहेत. हे अर्ज भरण्यासाठी ५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती.मात्र, आता अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.
शाळांनी अर्ज कसा करावा?
माध्यमिक शाळांनी अर्ज करण्यापूर्वी शाळा, संस्था आणि शिक्षक याबाबतची माहिती मंडळाकडे पाठवावे लागणार आहे.परीक्षा अर्ज हे शाळेमार्फत अर्ज भरणे आवश्यक आहे.
Discussion about this post