दहावी पास असलेल्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. ती म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनने GD कॉन्स्टेबल पदासाठी भरतीची घोषणा केली आहे. विशेष या मेगाभरतील सुरुवात देखील झाली आहे. पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा.
तब्बल ३९,४८१ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. यामध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF), केंद्रिय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (CRPF), ITBP ही पदे भरती केली जाणार आहे.
सचिवालय सुरक्षा दल (SSF), रायफलमन, NCB मध्ये शिपाई पदासाठी भरती सुरु झाली आहे. या नोकरीसाठी १० वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. ऑनलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज करु शकतात.अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२४ आहे.
पात्रता आणि वय अट :
अर्ज करणारा उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्षे असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
इतकी फी भरावी लागेल?
या भरतीसाठी १०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. १८ ते २३ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
अशी होईल निवड?
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड संगणक आधारित टेस्ट घेऊन करण्यात येणार आहे. त्यानंतर शारीरिक टेस्ट, वैद्यकीय तपासणीनंतर कागदपत्रे पडताळणी केली जाईल.
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |















Discussion about this post