भुसावळ । रेल्वे प्रशासनाने होळी सणानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढीलप्रमाणे गाड्या सुरू केल्या आहेत :
वलसाड – दानापूर साप्ताहिक विशेषगाडी क्रमांक ०९०२५: दि. ३ मार्च ते ३ मेपर्यंत प्रत्येक सोमवारी वलसाड येथून सकाळी ८:४० वा. सुटेल.
गाडी क्रमांक ०९०२६: दि, ४ मार्च ते १ जुलैपर्यंत प्रत्येक मंगळवारी दानापूर येथून दुपारी अडीच वाजता सुटेल. नंदुरबार, जळगाव, भुसावळ, खंडवा आदी ठिकाणी थांबे असतील. उधना-पटना साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक ०९०४५ : दि. ७ मार्च ते २७ जूनपर्यंत प्रत्येक शुक्रवारी उधना येथून सकाळी ८:३५ वाजता सुटेल.
गाडी क्रमांक ०९०४६ : ८ मार्च ते २८ जूनपर्यंत प्रत्येक शनिवारी पाटणा येथून दुपारी १. ३५मिनिटाने सुटेल. नंदुरबार, जळगाव, भुसावळ, खंडवा आदी ठिकाणी थांबे असतील.
पं. दीनदयाळ उपाध्याय जं., बक्सर आणि आरा. राजकोट-महबूबनगर साप्ताहिक विशेष गाडी गाडी क्रमांक ०९५७५ : दि. ३ मार्च ते ३० जून प्रत्येक सोमवारी, राजकोट येथून दुपारी १:४५ वाजता सुटेल.
गाडी क्रमांक ०९५७६ : दि. ४ मार्च ते १ जुलैपर्यंत दर मंगळवारी महबूबनगर येथून रात्री १०:१० वाजता सुटेल. नंदुरबार, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला आदी थांबे असतील.
बांद्रा टर्मिनस – रेवा अनारक्षित गाडी क्रमांक ०९१२९ : ६ मार्च ते २६ जूनपर्यंत प्रत्येक गुरुवारी बांद्रा टर्मिनस येथून सकाळी ४:३० वाजता सुटेल.
गाडी क्रमांक ०९१३० : दि. ७ मार्च ते २७जूनपर्यंत प्रत्येक शुक्रवारी रेवा येथून सकाळी ११ वा. सुटेल. नंदुरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, खंडवा आदी ठिकाणी थांबे असतील.
Discussion about this post