होळी उत्सवानिमित्त नागपूरसह उत्तर भारतातील प्रमुख शहरांसाठी विशेष गाड्या धावणार आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता पुण्यातून धावणाऱ्या दानापूर, गोरखपूर, नागपूर आणि हजरत निजामुद्दीनसाठी ह्या रेल्वे गाड्या धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण १८ फेब्रुवारीपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर सुरू होणार आहे.
पुणे-नागपूर आठ फेऱ्या
पुणे-गोरखपूर दैनिक विशेष ३२ फेऱ्या, पुणे-दानापूर दैनिक विशेष ३२ फेऱ्या आणि पुणे-दानापूर द्वि-साप्ताहिक ८ फेऱ्या धावणार आहेत. त्यानुसार पुणे-नागपूर गाडी क्रमांक ०१४६९ (साप्ताहिक) ही गाडी पुण्यातून २४ फेब्रुवारी व ३ मार्च रोजी दुपारी १ वाजून 50 मी. पुण्याहून सुटेल. तर नागपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता पाहोचेल. तर गाडी क्र. ०१४७० ही २५ फेब्रुवारी व ४ मार्च रोजी सकाळी आठ वाजता नागपूरहून निघेल. पुण्यात त्याच दिवशी रात्री साडेअकरा वाजता पोहोचेल.
पुणे-गोरखपूर दैनिक विशेष गाडी क्र. ०१४१५ ही गाडी २१ फेब्रुवारी ते ८ मार्चदरम्यान दररोज सकाळी ६ वाजून 50 मिनिटांनी पुण्याहून सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. गाडी क्र. ०१४१६ ही २२ फेब्रुवारी ते ९ मार्चदरम्यान दररोज सायंकाळी साडेपाच वाजता गोरखपूर येथून निघून पुण्यात तिसऱ्या दिवशी पहाटे सव्वातीन वाजता पोहोचेल.
पुणे-दानापूर द्वि-साप्ताहिक गाडी क्र. ०१४४९ ही दि. २१ फेब्रुवारी ते ८ मार्चदरम्यान दररोज दुपारी साडेतीन वाजता पुण्याहून निघेल. तिसऱ्या दिवशी पहाटे पावणेतीन वाजता दानापूर येथे पोहोचेल. गाडी क्र. ०१४५० ही दि. २३ फेब्रुवारी ते १० मार्चदरम्यान दररोज सकाळी पाच वाजता दानापूर येथून निघून पुण्यात दुसऱ्या दिवशी सायंकाळी सव्वासहा वाजता पोहोचेल.
पुणे-दानापूर द्वि-साप्ताहिक गाडी क्र. ०१४८१ दि. २३, २७ फेब्रुवारी व २, ६ मार्च रोजी सायं. ७:५५ वा. पुण्याहून निघून तिसऱ्या दिवशी पहाटे ४:२० वा. दानापूर येथे पोहोचेल. गाडी क्र. ०१४८२ दि. २५ फेब्रुवारी, १, ४, ८ मार्च रोजी सकाळी ८:०० वा. दानापूर येथून निघून पुण्यात दुसऱ्या दिवशी सायं. ६:१५ वा. पोहोचेल.















Discussion about this post