नवी दिल्ली । जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या वर्षभरापासून दहशतवाद्यांची घुसखोरी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने मोठी कारवाई करत सीमा सुरक्षा दलाचे (BSF) डायरेक्टर जनरल नितिन अग्रवाल यांच्यासह बीएसएफचे स्पेशल डीजी वाय.बी. रुराानिया यांना पदावरुन हटवण्यात आले आहे.
जम्मू-काश्मिरातील घुसखोरीमुळे सरकारने उचललेले हे सर्वात मोठे प्रशासकीय पाऊल आहे. सर्वोच्च अधिकाऱ्यांवर ही कारवाई झाली आहे. नितिन अग्रवाल यांनी त्यांचे मुळ केडर केरळमध्ये परत पाठवले आहे. तर डीजी वाय.बी. रुराानिया यांना पुन्हा ओडिशा केडरमध्ये पाठवले आहे.
गेल्या अनेक वर्षांत प्रथमच अशी कारवाई
पंजाबच्या सीमावर्ती भागातून अतिरेक्यांची घुसखोरी वाढली होती. त्यावर नियंत्रण आणण्यात दोन्ही अधिकाऱ्यांना अपयश आले. यामुळे ही कारवाई झाली आहे. मागील अनेक वर्षांत प्रथमच सर्वोच्च अधिकाऱ्यांवर अशी कारवाई झाली आहे. भारतीय अर्धसैनिक दलाचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याचे हे दुर्मिळ उदाहरण आहे. त्याच्या जागी लवकरच नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
Discussion about this post