अकोला । सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून अपेक्षेप्रमाणं दर मिळत नसल्याचं चित्र आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. मात्र,अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विक्रमी दरात सोयाबीनची खरेदी केल्याने शेतक-यांमध्ये आनंददायी वातावरण हाेते.
दीपावली निमित्त आयोजित शेतमाल खरेदीच्या शुभारंभमध्ये जाहीर लिलावात सोयाबीनची 5 हजार 52 रुपये प्रतिक्विंटलवर बोली लावण्यात आली. सोयाबीनला मिळालेला हा दर यंदाच्या हंगामातील दराचा विक्रम मोडणारा ठरला.
खरंतर महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दर मिळत होता. विशेष म्हणजे गेल्या हंगामापासून सोयाबीनचे दर दबावात होते. मध्यंतरी तर सोयाबीनला चार हजारापेक्षा कमीचा भाव मिळाला होता.आता अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनची चमक वाढतीच राहून आज 5250 चा भाव सोयाबीनला मिळाला. आगामी काळात अजून भाव वाढण्याची शक्यता आहे. आता सोयाबीनची खरेदी सुरळीत झाली असून शेतकऱ्यांनी एपीएमसीला सोयाबीन घेऊन येण्याचेही आवाहन ही यावेळी करण्यात आले आहे.
Discussion about this post