जळगाव । एकीकडे महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडून ठेवली आहे. गेल्या काही काळात सोयाबीन तेलाचे भावही मोठ्या प्रमाणत वाढले आहे. मात्र गेल्या दीड महिन्यापासून तेलाचे भाव स्थिर होते. परंतु आता पुन्हा एकदा त्यात वाढ झाली आहे. सोयाबीन तेलाच्या दरात प्रति किलोमागे सहा रुपयांची वाढ झाली आहे, आणि आगामी काळात आणखी तीन रुपये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महिन्याभरापूर्वी, सोयाबीन तेलाचे दर १२७ ते १३५ रुपये दरम्यान होते. आता हे दर १३३ ते १४० रुपये झाले आहेत. या दरवाढीचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेच्या सत्तेत पुन्हा आलेल्या डोनाल्ड ट्रम्प सरकारचे नवे जागतिक आयात धोरण. या धोरणानुसार, सर्वच आयात मालावर १० टक्के वाढ, चीनच्या आयातीवर ६० टक्के शुल्क वाढ, आणि कॅनडा व मॅक्सिकोच्या आयातीवर २५ टक्के शुल्क वाढ विचाराधीन आहे. या शुल्क वाढीचा परिणाम सोयाबीन तेलाच्या दरावर दिसून येत आहे.















Discussion about this post