लग्नाचा मोसम चालू आहे. सोन्याचा भाव 63000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर कायम आहे. सोने महाग आहे, त्यामुळे लोकांना हवे असले तरी ते विकत घेता येत नाही. जर तुम्ही सोन्याच्या किमतीमुळे खरेदी करू शकत नसाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील आठवड्यापासून तुम्हाला स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. 12 फेब्रुवारी 2024 पासून तुम्ही केंद्र सरकारच्या गोल्ड स्कीम अंतर्गत गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करू शकता.
सार्वभौम गोल्ड बाँड 2023-24 योजनेचा चौथा हप्ता या महिन्याच्या 12 ते 16 तारखेपर्यंत खुला असणार आहे. भारत सरकारने ऑनलाइन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल माध्यमातून पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांना दर्शनी मूल्यावर 50 रुपये प्रति ग्रॅम सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बाँड्सची इश्यू किंमत 6,213 रुपये असेल, असं आरबीआयने म्हटलं आहे.
या योजनेत सोने कसे खरेदी करावे
या योजनेतंर्गत सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी, स्मॉल फायनान्स बँक, पेमेंट बँक आणि प्रादेशिक ग्रामीण बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, क्लियरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (NSE) द्वारे खरेदी करता येते.
या लोकांना सोने विकत घेता येणार
आरबीआय भारत सरकारच्या वतीने गोल्ड बाँड योजना जारी करते. केवळ भारतीय रहिवासी, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF, ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्था या सुवर्ण रोखे योजनेत गुंतवणूक करू शकतात. सोने रोखे योजना प्रथम नोव्हेंबर 2015 मध्ये सोन्याची मागणी कमी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती.
Discussion about this post