सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी रेल्वेत काम करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. साउथ सेंट्रल रेल्वेने () अप्रेंटिस पदांसाठी तब्बल २८०१ जागांची भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ एप्रिल २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेत विविध ट्रेडमध्ये उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, एसी मेकॅनिक, कारपेंटर आणि इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक अशा अनेक पदांचा समावेश आहे. उपलब्ध माहितीनुसार इलेक्ट्रिशियन पदासाठी सर्वाधिक १२५८ जागा रिक्त आहेत. त्याशिवाय फिटर पदासाठी ५३९, एसी मेकॅनिकसाठी २५१, वेल्डरसाठी २०२, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकसाठी ८८ आणि कारपेंटर पदासाठी २२ जागा भरल्या जाणार आहेत.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) प्रमाणपत्र असणेही अनिवार्य आहे. उमेदवारांचे वय १५ ते २४ वर्षे दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रथम नोंदणी (रजिस्ट्रेशन) करणे आवश्यक आहे. त्यानंतर लॉगिन करून अर्जाचा फॉर्म भरायचा आहे. अर्ज भरल्यानंतर आवश्यक फी भरून फॉर्म सबमिट करावा. भविष्यातील वापरासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
रेल्वे क्षेत्रात करिअर घडवण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही अप्रेंटिसशिप भविष्यातील संधींचे दरवाजे उघडू शकते. त्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळ न दवडता लवकरात लवकर अर्ज करावा.
अर्ज कसा करावा?
इच्छुकांनी scr.onlineregister.org.in/login या वेबसाइटवर जावे.
यानंतर रजिस्टरवर क्लिक करुन तुमची माहिती भरा आणि रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
यानंतर लॉग इन करुन फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर फी जमा करा.
फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून ठेवा.















Discussion about this post