धुळे । सोनगीर शहरातील विठ्ठल-रुखमाई सहकारी पतसंस्थेत झालेल्या धाडसी चोरीची उकल करण्यात सोनगीर पोलिसांना यश आले आहे. दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांचा साथीदार पसार झाला आहे. आरोपींच्या ताब्यातून तब्बल दोन किलो 300 ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली. शफीक शेख रफीक शेख (39, सालार नगर, अजिंठा चौफुली, धुळे) व अकबर मुस्कतकीन बागवान (पठाण, 36, आझादनगर, 80 फुटी रोड, धुळे) अशी अटकेतील सराईत आरोपींची नावे आहेत. आरोपींचा एक साथीदार पसार असून त्याचा कसून शोध सुरू आहे.
सोनगीरच्या विठ्ठल-रुखमाई सहकारी पतसंस्थेच्या खिडकीचे ग्रील तोडून चोरट्यांनी दागिण्यांसह साडेचार लाखांची घरफोडी केल्याची घटना 13 ते 14 जानेवारी दरम्यान घडल्यानंतर सोनगीर पोलसात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळाजवळून गेलेल्या एका कारच्या क्रमांकाआधारे संशयीत निष्पन्न करण्यात यंत्रणेला यश आले. गुन्ह्याचे तपासधिकारी उपनिरीक्षक रवींद्र महाले यांनी अत्यंत बारकाईने या गुन्ह्याचा तपास करीत दोघा आरोपींना निष्पन्न करीत त्यांच्याकडून दोन किलो 300 ग्रॅम चांदी जप्त केली तर त्यांचा एक साथीदार पसार झाला आहे.
Discussion about this post