जळगाव : प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांनी शाळेत परीक्षेत पहिला क्रमांक पटकवावा असं वाटत. याच दरम्यान, बारावीचा निकाल लागला, मुलाने शाळेत पहिला क्रमांक काढला, मुलगा पहिला आल्यामुळे आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या वडिलांना रस्त्यातच मृत्यूने वाटेत गाठले. अपघात वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना जामनेर तालुक्यात घडलीय.
घटना नेमकी काय?
जामनेर शहरापासून जवळच शहापूर रस्त्यावर मॅजिक गाडीने झाडाला धडक दिली, यामध्ये आनंदा भीमराव जगताप (रा. भारुडखेडा) हे जागीच ठार झाले. तर या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. दीपक मुरलीधर शेळके रा. भारुडखेडा हा गंभीर जखमी झाला. जखमी व्यक्तीला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान, आनंदा भीमराव जगताप यांचा मुलगा १२ वीच्या वर्गात शाळेत पहिला क्रमांक मिळविला आहे. मुलगा पहिला आल्यामुळे आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या वडिलांना मृत्यूने वाटेत गाठले. अपघात झाल्याची माहिती गावात पसरली त्यावेळी लोकांनी गावात हळहळ व्यक्त केली.
Discussion about this post