सध्या सोशल मीडियावर एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ फार वेगाने व्हायरल होत असून ज्यात खासगी रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये एकाच वेळी तीन मैत्रिणीचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटना जवळील कॅमेरात कैद झालीय. आता तरुणींच्या मृत्यूचाच थरारक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओतील दृश्ये इतकी भीतीदायक आहेत की पाहूनच कोणच्याही अंगावर काटा येईल.
Karnataka: Three Young Women Drown in Swimming Pool at Ullal Resort
In a tragic incident at the Vazco Resort in Ullal, Karnataka, three young women — Keerthana (21), Nishitha (21), and Parvathi (20) — drowned while swimming in the pool. pic.twitter.com/in0EOOz3YS
— Informed Alerts (@InformedAlerts) November 18, 2024
काय आहे प्रकरण?
माहितीनुसार, मंगळुरूमध्ये एका खासगी मालकीच्या रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूलमध्ये बुडून तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना घडली ते रिसॉर्ट मंगळुरूच्या उचिला बीचजवळ आहे. निशिता एमडी (21), पार्वती (20) व कीर्तना (21) अशी या मुलींची नावे आहेत. या घटेनमुळे मुलींच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या मुली म्हैसूरच्या असल्याचे सांगितले जात आहे. यात तुम्हाला मृत्यू कसा व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढतो ते दिसून येते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही मुलींपैकी निशिता नावाची मुलगी जेव्हा स्विमिंग पुलमध्ये उतरली तेव्हा ही सर्व दुर्घटना घडून आली. पार्वती नावाच्या मुलीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर कीर्तनानं मदतीसाठी उडी पूलमध्ये मारली. मात्र दुर्दुवाने तिघींचाही यात बुडून मृत्यू झाला. यापैकी तिघीनांही पोहता येत नव्हते. रिसॉर्टमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तरुणी स्वत:ला वाचवण्याचा आणि मदतीसाठी हाका मारण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत; परंतु त्यांच्या ओरडण्याला कोणीही प्रतिसाद देताना दिसले नाही. फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की, पूलच्या आजूबाजूचा परिसर निर्जन होता.
Discussion about this post