मुंबई । मराठा आरक्षणावरून राजकारण तापले असून यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. मराठा समाजाला आरक्षण त्वरित द्यावे, अशी मागणी विरोधकासह आंदोलक करीत आहे. यातच आता शिवसेनेचे (उबाठा) नेते खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावे. मराठ्यांना आरक्षण देणे हे केंद्र सरकारच्याच हातात आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारात गुंतलेत आणि महाराष्ट्र पेटलेला आहे. जरांगे पाटलांचे प्राण पणाला लागले आहेत. त्यांना काही झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत संजय राऊतांनी राज्य सरकारसह पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
‘जरांगेंना काही झालं तर, महाराष्ट्र पेटेल आणि त्यांना महाराष्ट्र पेटवायचाय का? त्यासाठीच हे सगळं चाललंय का?’, असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केलाय. पंतप्रधानांनी मनोज जरांगे पाटलांशी किमान फोनवरून तरी संवाद साधलापाहिजे. ते एक एक तास मन की बातमध्ये बोलतात, पण महाराष्ट्रातील जरांगे पाटलांशी संवाद साधायला त्यांना अजिबात वेळ नाही, अशी टीका देखील संजय राऊतांनी केली आहे.















Discussion about this post