मुंबई – राज्यभरात १३ नगरसेवकांनी बिनविरोध विजयी झाल्याने गुलाल उधळण केली आहे. यात जळगाव महापालिकेत महायुतीच्या ४ उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यात शिवसेना शिंदे गटाचे तीन जागा आहेत.दुसरीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिवसेनेच्या महायुतीने मतदानापूर्वीच विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे.
भाजपचे ५ आणि शिंदेसेनेचे ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची रणनीती यशस्वी ठरत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता शिंदेसेनेचेही ४ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांची खेळी यशस्वी झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.
जळगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ अ मधून आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे पुत्र डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे बिनविरोध निवडून आले आहेत. या प्रभागातील विरोधी उमेदवाराने माघार घेतल्यामुळे डॉ. सोनवणे यांचा विजय निश्चित झाला. याच बरोबर प्रभाग क्रमांक १४ अ मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) प्रकाश भागानगरे बिनविरोध विजयी झाले आहेत.















Discussion about this post