जळगाव । लोकसभा लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. जळगावमधून भाजपने विजयाची परंपरा कायम राखली आहे. जळगावमधून भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी जवळपास पाऊणे दोन लाख मतांची आघाडी घेतली असून विजयाकडे वाटचाल केली आहे.
दरम्यान स्मिताताई वाघ यांनी मोठी लीड घेतल्याने जळगाव येथील भाजप कार्यालयात भाजपच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जोरदार जल्लोष सुरू केलायं, याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज व कार्यकर्ते उपस्थित होते
जळगाव लोकसभेमध्ये महायुती भाजपा उमेदवार स्मिता वाघ व महाविकास आघाडी उद्धव ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात लढत होत आहे. मतमोजणी सुरु असून १७-१८ फेरीअंती तब्बल जवळपास पाऊणे दोन लाख मतांनी स्मिता वाघ यांनी आघाडी घेतली आहे.
जळगाव लोकसभेच्या भाजपा उमेदवार स्मिता वाघ यांना ५,१०,४७२ मते मिळाली आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार करण पवार पाटील यांना ३ लाख १४ हजार ६७० मते मिळालेली आहे.















Discussion about this post