काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जवळपास २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले.मृतांमध्ये दोन परदेशी पर्यटकांचा समावेश आहे. दरम्यान, सुरक्षा यंत्रणांनी या हल्ल्यामागील तीन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी केली आहेतआसिफ फुजी, सुलेमान शाह आणि अबू ताल्हा अशी या तिन्ही दहशतवाद्यांची नावे पुढे आली आहेत.
पहलगामधील हल्लेखोर दहशतवादी हे बंदी घातलेला दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ची शाखा असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटचे सदस्य आहेत. पहलगाममधील हल्ला हा अलिकडच्या काळातील काश्मीरमधील सर्वात घातक दहशतवादी हल्ल्यांपैकी एक आहे.
पहलगाममध्ये सभोवतालच्या घनदाट पाइन जंगलातून किमान ५ ते ६ दहशतवादी बैसरन येथे आले आणि त्यांनी AK-४७ ने पर्यटकांवर गोळीबार केला. या गटात हल्ल्याच्या काही दिवस आधी खोऱ्यात घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा समावेश होता, अशी माहिती गुप्तचर सूत्रांनी दिली आहे. या हल्ल्याचा मास्टरमाईंड लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख कमांडर सैफुल्लाह कसुरी उर्फ खालिद असल्याचे गुप्तचर संस्थांचे म्हणणे आहे.
Discussion about this post