नेल्लोर । आंध्रप्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यामध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून यात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २० जण गंभीर जखमी झालेत. अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात एक भीषण अपघाताची घटना घडली. जिल्ह्यातील मुसुनुरु टोल प्लाझा येथे ट्रक आणि बसची धडक झाली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री 2 वाजता श्रीकालहस्तीकडे जाणाऱ्या दोन बैलांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला लोखंडी वाहतूक करणाऱ्या दुसऱ्या ट्रकने मागून धडक दिल्याने हा अपघात झाला.
अपघातानंतर लोखंड घेऊन जात असलेल्या ट्रक चालकाचे गाडीवरील सुटले आणि थेट पलिकडून येणाऱ्या एका खासगी बसला धडक दिली. या धडकेत ६ जणांचा मृत्यू झाला तर २० जण जखमी झालेत. अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Discussion about this post