नवी दिल्ली: भारतीय निवडणूक आयोगाने देशभरात ‘स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन’ (SIR) प्रक्रिया राबवण्याची घोषणा केली आहे. सध्या १२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही प्रक्रिया सुरू असून उर्वरित २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लवकरच अंमलबजावणी होणार आहे.
मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण आणि त्रुटी दूर करण्याच्या उद्देशाने ही विशेष मोहीम राबवली जात आहे. निवडणूक आयोगाने संबंधित २३ राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवून प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या राज्यांत होणार अंमलबजावणी
आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, कर्नाटक, लडाख, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, दिल्ली, ओडिशा, पंजाब, सिक्कीम, तेलंगणा आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रिया राबवली जाणार आहे. दरम्यान, बिहारमध्ये या प्रक्रियेला आधीच सुरुवात झाली आहे.
उद्देश काय ?
भारतीय निवडणूक आयोगाने १९५१ ते २००४ दरम्यान देशभरात आठ वेळा एसआयआर आयोजित केला. आता, २१ वर्षांनंतर, एसआयआर आयोजित केला जात आहे. देशभरातील मतदार याद्या अद्ययावत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. एसआयआरचा उद्देश प्रत्येक राज्यातील मतदार यादीत नवीन मतदार जोडणे, मृत मतदारांची नावे काढून टाकणे, बेकायदेशीर मतदारांची ओळख पटवणे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेल्या मतदारांना काढून टाकणे हा आहे. फसवणूक रोखणे आणि बनावट मतदारांची नावे काढून टाकणे ही सर्वोच्च प्राथमिकता आहे.















Discussion about this post