मुंबई । गेल्या महिनाभरात सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ झाली होती, त्यामुळे सोन्याने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. यानंतर सोने दरात घसरण दिसून आली होती. मात्र आता दुसरीकडे चांदीने नवा उच्चांक गाठला आहे. चांदीने त्याच्या सार्वकालिक उच्चांकाला स्पर्श केला आहे, तर सोने त्याच्या उच्च पातळीच्या खाली व्यवहार करत आहे.
आज पुन्हा दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाल्याची पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबर, चांदीच्या दरातही वाढ झाल्याचे पाहायला मिळाली आहे.यामुळे चांदीचा दर प्रथमच ९० हजार रुपयावर गेला आहे.
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७४,०६० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७३,१८० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. तर दुसरीकडे चांदी ९१,३२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८७,२५० रुपये प्रतिकिलो होती.
मुंबई
२२ कॅरेट सोन्याचा दर ६७,७६९ रुपये
२४ कॅरेट सोन्याची किंमत ७३,९३० रुपये
पुणे
२२ कॅरेट सोन्याचा दर ६७,७६९ रुपये
२४ कॅरेट सोन्याचा दर ७३,९३० रुपये
नागपूर
२२ कॅरेट सोन्याचा दर ६७,७६९ रुपये
२४ कॅरेट सोन्याचा दर ७३,९३० रुपये
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ६७,७६९ रुपये
२४ कॅरेट सोन्याचा दर ७३,९३० रुपये
Discussion about this post