जळगाव । जिल्ह्यात कापूस हंगाम केव्हाच संपला तरी शेतकऱ्यांच्या कापसाला अद्यापही मागणी नाही. कापसाला भाव नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. कापसाचे दर वाढण्याच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरातचा ठेवला आहे. मात्र अशातच आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाला मागणी वाढू लागल्याने कापसाला ८ ते ९ हजारांचा दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. असे असले तरी सध्या पाच ते साडेसहा हजारांचा दर व्यापारी देत आहे. मागणी वाढल्याने सात हजारांपर्यंत कापसाचे दर जातील असे व्यापाऱ्यांना वाटते.
स्थानिक शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही. यामुळे कापसाची विक्री शेतकऱ्यांकडून होत नव्हती. जिनिंग, स्पीनिंग चालकांच्या जिनिंगही एकाच शिफ्टमध्ये सुरू होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी नसल्याचे कपाशी भोवती फिरणारे अर्थचक्र थांबले होते.
यंदा ‘सीसीआय’चे केंद्र सुरू होऊनही कापसाची आवक वाढलेली नव्हती. शासकीय कापूस खरेदी ७ हजार २० रुपयांनी होत आहे. व्यापारी कापसाला पाच हजार ते ६ हजार ८०० चा दर देत आहेत.
त्यातही काही वेळा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा कापसाचा दर्जा खालावला. सुरवातीला सात ते नऊ हजारांपर्यंत भाव कापसाला मिळाला. नंतर मात्र कापसाला आंतरराष्ट्रीय स्तरावरूनच मागणी कमी झाल्याने कापसाचा दर सहा ते साडेसहा हजारांपर्यंत खाली आला.
Discussion about this post