सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. SIDBI ने काही रिक्त पदांसाठी भरती काढली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. सामान्य आणि स्पेशलिस्ट पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण ७६ पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
पगार (Salary)
या नोकरीसाठी निवड झाल्यावर ग्रेड ए पदासाठी १००००० रुपये तर ग्रेड बी पदांसाठी १,१५,००० रुपये पगार मिळणार आहे.यामध्ये अनुभवानुसार किंवा पात्रतेनुसार पगार मिळणार आहे. संपूर्ण भारतात ही भरती केली जाणार आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती तुम्हाला www.sidbi.in या वेबसाइटवर मिळणार आहे.
अर्जप्रक्रिया
या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची सुरुवात १४ जुलैपासून झाली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ११ ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकतात.त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
निवडप्रक्रिया
या नोकरीसाठी उमेदवारांनी निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होणार आहे. लेखी परीक्षा ६ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. फेज २ परीक्षा ४ ऑक्टोबह २०२५ रोजी होऊ शकते. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. नोव्हेंबरमध्ये इंटरव्ह्यू होऊ शकतात.
या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला सिडबीच्या अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे. तिथे करिअर या ऑप्शनवर क्लिक करा.त्यानंतर तुम्हाला ग्रेड ए आणि बी ऑफिसर पदांसाठी अर्ज करायची लिंक दिसेल. त्यावर क्लिक करुन अर्ज भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
Discussion about this post