स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियामध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात असून या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. अर्जप्रक्रिया ८ नोव्हेंबर २०२४ म्हणजेच कालपासून सुरु झाली आहे.
स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाने ग्रेड ए आणि ग्रेड बी ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर https://www.sidbi.in/en वर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर २०२४ आहे
स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाने याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. जनरल अँड स्पेशलिस्ट स्ट्रीममध्ये ग्रेड ए आणि बी ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे. २१ ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. ग्रेड ही पदासाठी २५ ते ३३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड फेज I,फेज II आणि मुलाखतीद्वारे सिलेक्शन केले जाणार आहे.या नोकरीसाठी ७२ रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.
असिस्टंट मॅनेजर (Grade A)पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कॉमर्स, इकोनॉमिक्स, गणित, स्टॅटिस्टिक्स, इंजिनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. एमबीए किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.तर मॅनेजर ग्रेड बी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेली असावी. त्याच्याकडे पाच वर्षांचा अनुभव हवा.
मॅनेजर ग्रेड बी (कायदा) या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्यात पदवी प्राप्त केलेली असावी. त्याचसोबत मास्टर्स केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे ५ वर्षांचा अनुभव असायला हवा.त ग्रेड बी आयटी मॅनेजर पदासाठी उमेदवाराने कॉम्प्युटर सायन्स, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन इंजिनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.















Discussion about this post