मुंबई : अयोध्या येथे प्रभू श्री राम लल्लांची प्राणप्रतिष्ठा येत्या 22 जानेवारी ला होणार यासाठी मोजक्याच लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. राम मंदिर सोहळ्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनाही श्री रामजन्मभूमी ट्रस्टकडून निमंत्रण मिळाले आहे.
मात्र प्रकाश आंबेडकर यांनी निमंत्रण आल्यानंतर ट्रस्टच्या निमंत्रणावर आभार व्यक्त करताना सोहळ्यास उपस्थित राहण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी निमंत्रण आल्यानंतर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांना पत्र पाठवत नाराजी व्यक्त केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी काय म्हटलं आहे?
अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराच्या अभिषेकासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार नाही. मी उपस्थित न राहण्याचे कारण म्हणजे भाजप आणि आरएसएसने हा कार्यक्रम हायजॅक केला आहे. धार्मिक सोहळा हा निवडणुकीच्या फायद्यासाठी राजकीय प्रचार बनला आहे. ते पुढे म्हणतात, माझे आजोबा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी इशारा दिला होता की “राजकीय पक्षांनी धर्म, पंथ यांना देशाच्या वर ठेवला तर आमचे स्वातंत्र्य दुसर्यांदा धोक्यात येईल आणि या वेळी कदाचित आम्ही ते कायमचे गमावू.” आज ही भीती खरी ठरली आहे. धर्म आणि पंथाला देशापेक्षा वरचे स्थान देणाऱ्या भाजप-आरएसएसने आपल्या राजकीय फायद्यासाठी हा कार्यक्रम घेतला आहे.
Discussion about this post