मुंबई । राज्यात महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना प्रचंड वाढल्या आहे. अनेक ठिकाणी बलात्कार, विनयभंग, अपहरण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडत आहेत.यातच शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत आल्यानंतर राज्यातील महिला सुरक्षेला प्राधान्य देण्याचा दावा केला होता. पण हा दावा फोल ठरल्याचं दिसून येत आहे.
गेल्या ८ महिन्यात राज्यात महिला-तरुणींचा विनयभंग, अत्याचार तसेच अश्लील वर्तनाच्या अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई शहर पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईत ८ महिन्यात महिला अत्याचारासंबधित तब्बल १२५४ घटना नोंदवल्या गेल्या आहेत. अन्य शहरांच्या तुलनेत हे प्रमाण चारपटीने जास्त आहे.
मुंबईनंतर दुसरा क्रमांक पुणे शहराचा आहे. पुण्यात गेल्या ८ महिन्यांत विनयभंग/अश्लील वर्तनाच्या ३६४ घटना घडल्या आहेत. यामध्ये १२४ घटना बलात्काराच्या (Crime News) असून तसे गुन्हे देखील दाखल झाले आहेत. महिला अत्याचाराच्या घटनेत तिसऱ्या क्रमांकावर नागपूर असून गेल्या ८ महिन्यांत नागपुरात ३०४ महिलांच्या विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. तर १६५ महिलांवर बलात्काराच्या घटना नोंदवल्या आहेत.
Discussion about this post