नवी दिल्ली । दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण पसरले आहे. या हल्ल्यानंतर देशभरातील विविध सुरक्षा तपास यंत्रणेकडून छापेमारीची मोहीम राबवण्यात येत असून अशातच तपास यंत्रणांनी या स्फोटानंतर डॉ. शाहीन शाहिद हिला अटक केली आहे. शाहीनचे दहशतवादी संघटना जैशसोबत कनेक्शन तपासात पुढे आले होते. चौकशीदरम्यान शाहीनने अनेक खुलासे केले आहेत.
भारतातील जैश-ए-मोहम्मदची महिला कमांडर डॉ. शाहीन शाहिद गेल्या दोन वर्षांपासून स्फोटके गोळा करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाहीन शाहिदची सतत चौकशी केली जात आहे. तसेच या चौकशीतून आणखी बडे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, “चौकशीदरम्यान तिने कबूल केले आहे की ती आणि तिचे सहकारी डॉक्टर भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत होते. याविषयी तिने,”जेव्हा जेव्हा ती डॉक्टर उमरला भेटायची तेव्हा तो उत्साहाने म्हणायचा की, देशभरात खूप सारे दहशतवादी हल्ले करायचे आहेत” असे म्हणत असल्याचा मोठा खुलासा केला आहे. तसेच शाहिन, मुजम्मिल आणि आदिल यांच्यासह सारेच दोन वर्षांपासून अमोनियम नायट्रेटसारखी स्फोटके गोळा करत होते. हे सर्व जैश-ए-मोहम्मद (जेईएम) या दहशतवादी संघटनेच्या इशाऱ्यावर केले जात होते.















Discussion about this post