पुणे । MPSC परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवार हीच राजगड किल्ल्यावर मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आता प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. दर्शनाचा मृत्यू घातपातामुळे झाला असा खुलासा पोस्टमार्टम रिपोर्टमधून झाला आहे. याशिवाय पोलिसांनी सुद्धा तिच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासे केले आहेत.
दर्शना पवार हिचा खून झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे. तसंच सर्व प्रकारानंतर राहुल हंडोरे हा दर्शनाचा मित्र बेपत्ता आहे. तरुणीच्या मृतदेहाजवळ राहुलचे जर्किन सापडले आहे. दर्शनाची हत्या तिच्या मित्रानेच केली असावी, असा संशय आहे. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.
मूळ अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील असणाऱ्या दर्शना पवारने एमपीएससी परीक्षेत राज्यात सहावा क्रमांक पटकावला होता. दर्शनाची निवड वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून करण्यात आली होती.
Discussion about this post