मुंबई । विषयी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आयएएस प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकर यांच्या प्रकरणात बरीच धक्कादायक माहिती समोर आणली आहे. IAS च्या ट्रेनी अधिकारीसाठी काही नियम असतात. त्याच पालन होत नसल्याने पूजा खेडकर नजरेत आल्या.
प्रोबेशनर असताना ऑडी गाडीतून येणं, दुसऱ्यांची केबिन बळकावणं, अधिकाऱ्यांना त्रास देणं या वर्तनामुळे डॉ. पूजा खेडकर नजरेत आल्या. जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे यांनी याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट मुख्य सचिवांना पाठवल्यानंतर आता पूजा खेडकर यांची वाशीमला बदली झाली आहे.
आता डॉ. पूजा खेडकर यांच्या संपत्तीबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी डॉ. पूजा खेडकर यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांकडे नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र असून 110 एकर शेतजमीन आहे. ही मालमत्ता म्हणजे शेतजमीन कमाल मर्यादा कायद्याचे उल्लंघन आहे, असा आरोप विजय कुंभार यांनी केला आहे.
1.6 लाख चौरस फुटाची 6 दुकान आहेत. 7 फ्लॅट असून यात हिरानंदानी या पॉश वस्तीत एक फ्लॅट आहे. 900 ग्रॅम सोने, हिरे, 17 लाख रुपये किंमतीच सोन्याचं घड्याळ आहे. 4 कार, दोन प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये भागीदारी आणि एक ऑटोमोबाईल कंपनी आहे. स्वत: पूजाकडे 17 कोटी रुपयांची संपत्ती आहे. याची चौकशी व्हायला नको का? असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी विचारला आहे.















Discussion about this post