जळगाव – खुनाच्या गुन्ह्यातील एका बंदीवर चार जणांनी अनैसर्गिक कृत्य करून लोखंडी पट्टीने त्या बंदीच्या गळ्यावर वार केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्हा कारागृहात घडली. याबाबत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत असे की, जळगाव जिल्हा कारागृहातील वर्ग २ मध्ये खूनाच्या गुन्ह्यात असलेला २६ वर्षीय संशयिताला ठेवण्यात आले आहे. त्याच्यासोबत बॅरेक १ व २ मध्ये भावेश कांतीलाल दंडगव्हाळ, विक्की शिंदे, कलीम शेख सलीम, विजय उर्फ राणा दिलीप चव्हाण या बंद्यांना ठेवले होते. दि. १२ रोजी त्या बंद्याला बाथरुममध्ये घेवून जात त्याच्यावर बळजबरीने अनैसर्गिक कृत्य केले. तसेच कोणाला काही सांगण्याचा प्रयत्न केला, तर तुला बघुन घेईल जीवे सोडणार नाही अशी धमकी दिली. त्याच दिवशी पहाटे चार वाजेच्या सुमारास तो बंदी झोपलेला असतांना त्याच बॅरेकमधील विक्की शिंदे याने त्याला उठवित अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या बंदीने त्यांना नकार दिला असता, त्यांनी त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील लोखंडी पट्टीने त्या बंदीच्या गळ्यावर वार केले.
गळ्यावर वार झाल्याने जखमी झालेला बंदी जमिनीवर कोसळल्यानंतर बंद्यांनी दिलेल्या धमकीला घाबरुन तो गळ्याला कापड बांधून झोपून गेला. या घटनेबाबत कारागृहातील बंदीने त्या जखमी बंदीची विचारपुस केली. त्याने घडलेल्या प्रकाराबाबत त्याला सांगितला. हा प्रकार कारागृह प्रशासनाला माहिती पडताच त्यांनी बंदीला कारागृहातील इतर बॅरेकमध्ये ठेवले.
दरम्यान, याप्रकरणी कारागृहातील बंदी भावेश कांतीलाल दंडगव्हाळ याच्यासह त्याचे मित्र लोखंडी पट्टीने वार करुन अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करणारे त्याचे मित्र विकी शिंदे, कलीम शेख सलीम, विजय उर्फ राणा दिलीप चव्हाण यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास चऱ्हाटे हे करीत आहे.