जळगाव । नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला उद्या १६ डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी महायुती सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. या शपथविधी सोहळ्यामध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मंत्री शपथ घेणार असून या शपथविधी सोहळ्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. भाजपपाठोपाठ आता शिवसेनेचे जे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत त्यांची नावं समोर आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे २१, शिवसेनेचे १२ आणि राष्ट्रवादीचे १० मंत्री आज शपथ घेणार आहेत. शिवसेनेचे एकूण ११ आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. हे सर्व आमदार नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. शिवसेनेकडून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या सर्व आमदारांची नाव समोर आली आहेत. शिवसेनेकडून मंत्रिपदावर कोणाकोणाची वर्णी लागणार आहे हे आपण पाहणार आहोत..
शिवसेनेचे हे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत –
१) उदय सामंत
२) शंभुराजे देसाई
३) गुलाबराव पाटील
४) दादा भुसे
५) संजय राठोड
६) संजय शिरसाट
७) भरतशेठ गोगावले
८) प्रकाश अबिटकर
९) योगेश कदम, कोकण
१०) आशिष जैस्वाल
११) प्रताप सरनाईक
Discussion about this post