महायुतीचा शपथविधी पार पडल्यांनंतर नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? याकडे लक्ष लागून होते. यातच उद्या शनिवारी फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आलीय. मात्र यावेळी तिन्ही पक्षाकडून कोण-कोण मंत्रिपदाची शपथ घेणार हे अद्यापही जाहीर करण्यात आले नाहीय.
भाजपला २० पेक्षा जास्त, तर शिवसेनेला १२ ते १३ आणि राष्ट्रवादीला १० खाती मिळण्याची शक्यता आहे. अशातच शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपची मंत्रिपदाची यादी निश्चित झाली आहे. यात शिवसेनेकडून अनेक विद्यमान खासदारांना धक्का दिल्याचे सूत्रांकडून समजतेय.
एकनाथ शिंदे यांच्याकडून शनिवारी ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. यामध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. नव्या मंत्रिमंडळात धक्कातंत्र भाजपकडून वापरण्यात येईल, असा अंदाज वर्तवलाय जातोय. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी अनेक माजी मंत्र्यांची धाकधूक वाढवणारी ठरणार आहे. पहिल्या यादीत अनेकांची नावे नसल्याचे दिसतेय. तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, संजय राठोड, अश्या अनेकांना धक्का बसण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री
उदय सामंत
शंभूराजे देसाई
गुलाबराव पाटील
दादा भुसे
प्रताप सरनाईक
संजय शिरसाठ
भरत गोगावले
आशिष जयस्वाल
योगेश कदम (राज्यमंत्री)
विजय शिवतारे (राज्यमंत्री)
कोल्हापूर – आबिटकर किंवा याद्रावकर (राज्यमंत्री)
Discussion about this post