मुंबई । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षबदल करताना दिसत आहेत. अशातच आता ठाकरे यांच्या शिवसेनेला अजितदादांनी मोठा धक्का दिला आहे. जालन्यातील माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आज (16 सप्टेंबर) जाहीर प्रवेश केला.
शिवाजीराव चोथे यांचे जालना जिल्ह्यात चांगलेच वजन आहे. काही दिवसांपूर्वी माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता. तसेच दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आपले (उद्धव ठाकरे) प्रेम गेली 40 वर्षे लाभले. मी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असला तरी बाळासाहेब ठाकरे, आपण तसेच मातोश्रीबद्दल माझ्या मनात कायम आदर असेल, असे चोथे यांनी आपल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटले होते.
त्यांनतर आता त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. शिवाजीरावच चोथे यांच्या या निर्णयानंतर आता जालना जिल्ह्यात शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पक्षप्रवेशानंतर शिवाजीरावांचा राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दीर्घ अनुभव हा नक्कीच जनकल्याणाच्या कार्यात उपयोगी पडेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. तसेच मी त्यांच्यासह सर्वांचं मनापासून स्वागत करतो, असे म्हणत अजित पवार यांनी शिवाजीराव चोथे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.















Discussion about this post