मुंबई : राज्यात सत्तांतर होऊन आता वर्ष उलटलं आहे. पण तरीही शिंदे-फडवणीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार न झाल्यामुळे सत्ताधारी शिवसेना पक्षातील आमदारांमध्ये देखील धुसफूस आहे. शिवसेनेच्या काही आमदारांनी तर जाहीरपणे नाराजी देखील व्यक्त केली आहे. पण आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या काही नेत्यांना डच्चू देखील मिळणार असल्याची चर्चा आहे. तर काही नेत्यांना थेट केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.
काही दिवसापूर्वी भाजपकडूनच शिवसेनेच्या वाचाळविरांना मंत्र्यांना डच्चू देण्याचे आदेश शिवसेनेला भापच्या हायकमांडर यांच्याकडून देण्यात आले होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्याकडून थेट कारवाई केले जाणार असल्याची चर्चा आहे.
या मंत्र्यांना मिळणार डच्चू?
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या विस्तारात कृषीमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री संजय राठोड, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, मंत्री संदीपान भुमरे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची चर्चा आहे. पण नेमकं काय होतं ते मंत्रिमंडळाच्या विस्तारातूनच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रातील मोदी सरकार देखील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारातही काही नेत्यांना डच्चू दिला जाणार आहे. तर नव्या नेत्यांना संधी दिली जाणार आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या आमदार-खासदार आणि पदाधिकाऱ्यांना खूश करण्यासाठी शिवसेनेच्या काही खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या कोणत्या नेत्याची वर्णी लागणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Discussion about this post