जळगाव । शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मंगळवार दि.६ जून रोजी सकाळी उत्साहात शिवज्योत रॅली काढण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास विभाग, विचारधारा प्रशाळा, श्री.छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास व संशोधन केंद्र व सामाजिकशास्त्रे प्रशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवज्योत रॅलीची सुरुवात विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशव्दारापासून झाली. प्रशासकीय भवनाजवळ रॅलीचे विसर्जन झाले. तदनंतर श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या प्रतीमेचे पूजन करण्यात आले.
बेंडाळे महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी दिप्ती पाटील हिने खडया आवाजात शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पोवाडा सादर केला. संगीत साथ संगत जयेश साळुंके या विद्यार्थ्यांने दिली. रॅलीत प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, सहसंचालक संतोष चव्हाण, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.दीपक दलाल, छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास व संशोधन केंद्राचे प्रभारी प्रमुख प्रा.अजय पाटील, संचालक प्रा.ए.एम.महाजन, रासेयो संचालक प्रा.सचिन नांद्रे, डॉ.राजेश जवळेकर, डॉ.संजय शिंगाणे, डॉ.नितीन बडगुजर, डॉ.उमशे गोगडीया, डॉ.मनोज इंगोले, डॉ.शीला राजपूत, डॉ.विजय घोरपडे, विलास पाटील, सविता सोनकांबळे, डॉ.नीता पाटील, डॉ.कविता पाटील, अरुण सपकाळे, कैलास औटी, शिवाजी पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यासह रासेयो स्वयंसेवक व विद्यार्थी यांनी उपस्थित होते.