जळगाव : शिवजयंती निमित्त काढलेल्या मिरवणूकीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.बो.येथे घडलीय. दगडफेकीमध्ये काही पोलीस कर्मचारी व नागरीक जखमी झाले आहे. याप्रकरणी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
नेमका प्रकार काय?
गुरूवार २८ मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. याच दरम्यान, शिरसोली प्र.बो. गावातील इंदीरा नगरातून सायंकाळच्या सुमारास मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली होती. ही मिरवणूक रात्री ८ वाजता गावातील वराड गल्लीतील धार्मीक स्थळाजवळून जात असतांना अचानक मिरवणूकीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आले.
या मिरवणूकीवर दगडफेक आणि विटा फेकून मारल्याने मिरणूकीत सहभागी असलेले नागरीक आणि काही पोलीस कर्मचारी असे ५ ते ६ जण जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले.
पोलीसांनी संशयितांना ताब्यात घेण्याचे काम सुरू केले आहे. यात काही वाहनांचे देखील नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
Discussion about this post