Thursday, February 19, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

“छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण !” पालकमंत्री गुलाबराव पाटील

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 19, 2026
in जळगाव जिल्हा
0
“छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण !” पालकमंत्री गुलाबराव पाटील
बातमी शेअर करा..!

जिल्हा प्रशासन व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यांच्या वतीने आयोजित शहरातील मुख्य कार्यक्रमात, शिवरायांच्या विचारांवर पालकमंत्र्यांचे भावनिक प्रतिपादन

जळगाव | “छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण आहेत. शिवरायांचा इतिहास फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण विश्वासाठी प्रेरणादायी आहे,” छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा, विचारांचा आणि आदर्शांचा गौरव करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी असे भावनिक प्रतिपादन केले.

जिल्हा प्रशासन व जळगाव शहर सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकूल येथे आयोजित शिवजयंती उत्सव कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमास वस्त्रोद्योग मंत्री तथा सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष संजय सावकारे, महापौर दिपमाला काळे, आमदार सुरेश भोळे, उपमहापौर मनोज चौधरी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जैन इरिगेशन सिस्टीम लि. चे चेअरमन अशोक जैन अपर जिल्हाधिकारी डॉ.श्रीमंत हारकर, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले,सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, जळगाव गेल्या 26 वर्षांपासून सातत्याने आणि सर्वसमावेशक पद्धतीने शिवजयंती साजरी करत असून समाजातील सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन शिवरायांची जयंती साजरी करण्याची परंपरा जळगाव शहरात रुजवली आहे.या कार्यक्रमाच्या नियोजनाचे कौतुक करत पालकमंत्री पुढे म्हणाले की,“शिवजयंती म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर एक सामाजिक एकात्मतेचा संदेश आहे. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन शिवरायांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ही समिती सातत्याने करत आहे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे.

छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी ठरतात, “शिवरायांचा आदर्श प्रत्येकाने आपल्या कृतीत उतरवला पाहिजे. शिवरायांचे चरित्र हे सर्वांसाठी कायम प्रेरणादायी आणि ऊर्जास्रोत राहणार आहे.”

शिवजयंती महोत्सव समितीच्या उपक्रमांचे कौतुक करत पालकमंत्री यांनी आयोजकांचे अभिनंदन करून सर्व उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यावेळी आपल्या मनोगतात म्हणाले, आपल्या देशाचे महापुरुष व जे शूर वीर आहेत त्यांना कुठल्याही जाती धर्मात बांधताकामा नये, त्यांनी जी कामे केली आहेत ती प्रत्येक जाती धर्मासाठी व या देशासाठी केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या देशाला हिंदुत्वाची कास दिली आपला धर्म व संस्कार जागृत ठेवला त्यामुळे आज आपण हिंदू म्हणून अभिमानाने जगतोय ही सर्व छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आहे. शिवजयंती उत्सवात सर्व जाती धर्माचे,पक्षाचे लोक एकत्र सहभागी झाले असल्याचे सांगून मंत्री श्री सावकारे यांनी, शिवजयंती कार्यक्रमानिमित्त जमलेल्या सर्व शिवप्रेमीं, शिवभक्तांना यावेळी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात उपस्थित शिवभक्तांच्या ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारीत जीवंत देखाव्यांच्या माध्यमातून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत विविध शाळांचे, महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सूत्रसंचालन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे समन्वयक शंभू पाटील यांनी केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विनापरीक्षा थेट नोकरीची संधी! रेल्वेत ५३४९ पदांसाठी भरती जाहीर, अर्ज कसा करावा?

Next Post

राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध? हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध? हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध? हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्यातील पोलीस भरतीची परीक्षा ‘या’ तारखेला होणार परीक्षा

शिवप्रेमींसोबत बाचाबाची भोवली! चाळीसगावात API ची तडकाफडकी बदली

February 19, 2026
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत जम्बो भरती जाहीर; दहावी ते पदवीधरांना नोकरीची संधी

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत जम्बो भरती जाहीर; दहावी ते पदवीधरांना नोकरीची संधी

February 19, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

धुळे जिल्हा हादरला ! हळदीच्या कार्यक्रमात तुंबळ हाणामारीत तिघांचा मृत्यू

February 19, 2026
अजित पवार यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावुक ; ट्विट करत म्हणाले,” ही बातमी ऐकून खूप”

राहुल गांधींसह काँग्रेसच्या २५ खासदारांना घरात घुसून गोळ्या घालू; भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून धमकी, VIDEO ने उडाली खळबळ

February 19, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page