जळगाव । महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाल्यानंतर, शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) तब्बल तीन उमेदवारांची बिनविरोध निवड गुरूवारी सायंकाळपर्यंत निश्चित झाली होती. यांनतर आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाची आणखी एक जागा बिनविरोध झाली आहे. त्यामुळे महायुतीत भाजपपेक्षा शिवसेनेचा शिंदे गट सरस असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
आज शुक्रवारी प्रभाग १९ अ मधून रेखा चुडामण पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यामुळे महापालिकेत महायुतीचा पाचवा तर शिवसेना शिंदे गटाचा चौथा उमेदवार बिनविरोध झाला आहे.
याआधी शिवसेनेच्या तीन उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यात यात प्रभाग क्रमांक 18-अ मधून शिवसेना आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ गौरव चंद्रकांत सोनवणे, प्रभाग क्रमांक ९ अ मधून मनोज चौधरी तर प्रभाग 9 ‘ब’ मधून प्रतिभा देशमुख या बिनविरोध झाल्या आहेत.















Discussion about this post