भुसावळ । महामार्गावरील अपघाताचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नसून अशातच महामार्ग सहा वरील नशिराबाद नजीक अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत भुसावळातील उद्धव ठाकरे गटातील उपशहरप्रमुखाचा मृत्यू झाला. धनराज जगन ठाकूर (33, दीनदयाल नगर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, धनराज ठाकूर हा जळगाव येथून भुसावळकडे दुचाकीने येत असताना गुरुवारी रात्री गोदारवरीनजीक अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला. भुसावळातील ट्रामा सेंटरमध्ये शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर दुपारी एक वाजता तापी नदीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत तरुणाच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे.
Discussion about this post