मुंबई । गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र ज्या दिवसाची प्रतीक्षा करत होता, अखेर तो दिवस आता सत्यात उतरताना दिसत आहे.शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या युतीच्या अधिकृत घोषणेची तारीख अखेर ठरली आहे. खासदार संजय राऊत यांनी स्वत: ट्वीट करत युतीच्या अधिकृत घोषणेची तारीख सांगितली आहे.
संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एक फोटो शेअर केला आहे. यात राज ठाकरे उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देत असल्याचे दिसत आहे. सोबतच या फोटोला कॅप्शन देत संजय राऊत यांनी ‘उद्या १२ वाजता’ असे लिहिले आहे.यावरून बुधवारी (दि. २४) दुपारी १२ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे युतीची घोषणा करणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
युती आणि जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता
दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्यांची जागा वाटपासंदर्भात बैठक झाली असून आता दोन्ही प्रमुख नेते एकत्र येणार आहेत. या दोन्ही नेत्यांकडून उद्या दुपारी ठाकरे बंधूंच्या युती आणि जागावाटपाची घोषणा केली जाऊ शकते.
नुकतेच पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी, युती झालेली असून केवळ जागावाटपासंदर्भातली घोषणा बाकी आहे. आमच्यात जागा वाटपावरून कोणताही विसंवाद नाही. वरळीमधील डोमममध्ये जेव्हा दोन भाऊ एकत्र आले तेव्हाच युती झाली, असे सांगितले. त्यानंतर आता ट्विट करुन संजय राऊत यांनी युतीच्या घोषणेचा मुहूर्त सांगितला आहे.















Discussion about this post