रायगड । सध्या देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून नेत्यांकडून आपल्या पक्षातील उमेदवारांच्या प्रचार सभेत व्यस्त आहेत. याच दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे रायगड लोकसभा मतदारसंघ समन्वयक संजय कदम यांच्या कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. कारला आयशर ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील रोहा मधून संजय कदम प्रचार सभा आटोपून मुंबईला परत जात होते. त्यावेळी वाटेत असताना मुंबई कुर्ला मार्गावर संजय कदम यांच्या कारला आयशरने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत कारच्या मागच्या बाजूचा चुराडा झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी आयशर ट्रक ताब्यात घेतला आहे. या अपघातात संजय कदम यांच्यासह कारमधील अन्य व्यक्ती सुखरूप आहेत.















Discussion about this post