मुंबई । शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं वयाच्या 86 वर्षी निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्याने बुधवारी त्यांना हिंदूजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची आज (23 फेब्रुवारी ) पहाटे 3 वाजून 02 मिनिटांनी प्राणज्योत मालवली.
अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सद्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल.
मनोहर जोशी शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू नेते होते. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळ हळहळलं आहे. जोशी यांच्या निधनाचे वृत्त कळताच उद्धव ठाकरे यांनी आपला नियोजित बुलढाणा दौरा रद्द केला आहे. ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
मनोज जोशी यांच्या निधनावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शोक व्यक्त केला आहे. “शून्यातून विश्व निर्माण करणारे.. कडवट महाराष्ट्र अभिमानी अखेरच्या श्वासा पर्यन्त शिवसैनिक म्हणुन जगलेले मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन!”, असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.
Discussion about this post