जालना । जालना शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचे कार्यकर्ते गजानन तौर यांच्यावर तिघांनी गोळीबार केल्याची घटना आज घडली. गोळीबारानंतर स्थानिकांनी तात्काळ गजाननला उपचारासाठी जालन्याच्या सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
जालना शहरातील मंठा चौफुली भागातील होंडा शोरूमसमोर हा प्रकार घडला आहे. गजानन तौर हा रामनगर कारखान्याकडून जालनाकडे त्यांच्या चारचाकी वाहनाने येत होता. यावेळी पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या तीन जणांनी तौर यांच्यावर गावठी पिस्तूलातून गोळीबार केला.
गजानन तौर यांच्यावर चार गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे. चार गोल्यापैकी दोन गोळ्या तौर यांना लागल्या आहेत, तर दोन गोळया चाटून गेल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
गोळीबारानंतर स्थानिकांनी तात्काळ गजाननला उपचारासाठी जालन्याच्या सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गोळीबार झालेला गजानन तौर हा शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. या भयंकर घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.















Discussion about this post