होळीच्या दिवशी रक्तरंजित राडा झाला. पंजाबच्या मोगामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख मंगत राय मंगा यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमी मंगत यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मंगत यांना मृत घोषित केले.
दरम्यान अज्ञातांनी गोळीबार केला त्यावेळी एका ११ वर्षीय मुलाला गोळी लागली. त्यानंतर दुचाकी सोडून मंगत राय मंगा यांनी गोळीबार करणाऱ्यांचा पाठलाग केला. त्यावेळी अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर गोळीबार करणारे घटनास्थळावरून फरार झाले.
जखमी मुलाला सुरुवातीला मोगा शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र, पुढील उपचारासाठी इतर रुग्णालयात हलवण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे.
विश्व हिंदू शक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोंगिदर शर्मा यांनी सांगितलं की, ‘मंगत राय मंगा हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते. त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
मंगत राय मंगा यांच्या मुलीने सांगितलं की, ‘माझे वडील रात्री आठ वाजता दूध आणायला घराबाहेर गेले होते. त्यानंतर नेमकं काय झालं, माहीत नाही. त्यानंतर अकरा वाजता माहिती मिळाली की, वडिलांवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. आम्हाला न्याय हवा आहे. आम्ही त्यासाठी काहीही करायला तयार आहोत’.
Discussion about this post