धुळे । धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील पळासनेर ठिकाणी दोन ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये ट्रकच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
या अपघतामध्ये ट्रकमधील ७० पेक्षा जास्त बकऱ्यांचा मृत्यू झाला. तर अनेक बकऱ्या जखमी झाल्या. पाठीमागून येणाऱ्या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इंदुरवरू धुळ्याच्या दिशेने हे दोन्ही ट्रक येत होते. ज्या ट्रकने बकऱ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला धडक दिली त्यामध्ये मक्याच्या गोण्या होता
दरम्यान, या अपघातानंतर संपूर्ण रस्त्यावर मक्याची पोती पडली. अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. दोन्ही ट्रकचे अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक चालकाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवला. तर मृत्यूमुखी पडलेल्या बकऱ्यांना देखील बाहेर काढण्यात आले आहे. या अपघाताचा पुढील तपास महामार्ग पोलिस करत आहेत.















Discussion about this post