मुंबई । ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार शिरीष कणेकर यांचं निधन झालं. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. आज सकाळी प्रकृती खालावल्यामुळे शिरीष यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले.
रायगड जिल्ह्यातील पेण हे शिरीष कणेकर यांचं मूळ गाव. ६ जून १९४३ रोजी पुण्यात त्यांचा जन्म झाला होता. तर मुंबई विद्यापीठाची कायद्याची पदवी त्यांनी संपादन केली होती. सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण या विषयांवर त्यांचं लेखन प्रसिद्ध होतं.
माझी फिल्लमबाजी, कणेकरी ही पुस्तकं आणि कथाकथनाचे त्यांचे कार्यक्रम प्रसिद्ध झाले होते. आपल्या खास शैलीतून टोकदार लिखाण करणाऱ्या आणि समस्यावर विनोदी शैलीतून बोट ठेवणारे लेखक शिरीष कणेकर हे आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत.
Discussion about this post