बुलढाणा । राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असून याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. मात्र याच दरम्यान, महाराष्ट्रात मतदार यादीतील घोटाळ्याचा मुद्दा चांगलाच गाजत असून अशातच मतदार यादीवरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी नवा धक्कादायक खुलासा केला आहे.
एकट्या बुलढाणा शहराच्या मतदार यादीत किमान ४ हजार मतदारांचा घोळ आहे. तब्बल ४ हजार नागरिकांची दोन वेळा नावे असल्याचे गायकवाड म्हणाले होते. संजय राऊत आणि राज ठाकरे यांनी गायकवाड यांच्याच उदाहरणाचा दाखला देत निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले होते. आता शिंदे गट शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी मोठा खुलासा केला आहे.
दरम्यान मतदार याद्यांमधील घोळावरून प्रश्न केलेल्याने भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी त्यांना खडेबोल सुनावले होते. सत्तेमधील आमदारच बोलतोय, तर गायकवाड यांना समज द्यावी, असं म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना आमदार गायकवाड म्हणाले, संजय गायकवाड यांना समज द्यावी, पण हे समजून घ्या ना. विरोधी पक्ष हे करतोय याचा अर्थ सत्ताधारी पक्ष आरोपीच्या पिंजऱ्यात आहे असं नाही. ही घाण आधीचीच आहे. ती आपण साफ केली पाहिजे.
सत्तेतला आमदार बोलतोय म्हणजे त्याने असं बोलू नाही असं नाही. मतदार यादी मध्ये बोगस नावही पंधरा-वीस वर्षाआधीची आहेत. त्यावेळी युतीचं सरकार नव्हतं. ही बोगस नावे त्याकाळी काँग्रेसच्या काही नेत्यांनी निवडून येण्यासाठी टाकलेली आहेत. बुलढाण्यातील निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांची नावे दोन ठिकाणी आहेत, मात्र ते स्वतःही त्यांची नावे डिलीट करू शकत नाहीत. असं गायकवाड म्हणाले आहेत.
निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. त्यांना निवडणूक लढवायची आहे का..? बोगस नाव ठेवण्यात निवडणूक आयोगाला काय स्वारस्य आहे. निवडणूक आयोग ज्यावेळी बैठक घेतो त्यावेळेस एकही अधिकारी बैठकीला उपस्थित नसतो, सर्व कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर असतात, ज्यांना काही काळत नाही. हे पैसे घेऊन नावे टाकतात का? असा सवाल गायकवाड यांनी केला आहे.















Discussion about this post