मुंबई : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णय प्रक्रियेला वेग आला असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. नार्वेकर यांनी शिवसेनेच्या 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांना नोटीस बजावल्यामुळे आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे
दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मोठी बातमी आहे. सुनील प्रभूंनी दाखल केलेल्या याचिकेवर आजच निर्णयाची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाकडून विधानसभा अध्यक्षांना नोटीस दिली जाणार? का हे पाहणं महत्वाचं असेल.
लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी शिवसेना ठाकरे गटानं याचिका दाखल केली आहे. आज दुपारनंतर याबाबत कोर्टाकडून कार्यवाहीची शक्यता आहे.
आमदारांना पाठवलेल्या नोटीसीवर कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल नार्वेकरांनी उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस कशी बजावली याची कायदेशीत्या तपासावी लागेल. सुप्रीम कोर्टानं एकनाथ शिंदे यांची निवड आणि प्रतोद यांची निवड बेकायदेशीर आहे, असं म्हटलं होतं.
Discussion about this post