मुंबई । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील भाजप, शिंदे गट अजित पवार गटाच्या महायुतीसह महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटला आहे. कोण किती जागा लढेल हे ठरलेलं नाहीय. अशातच लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षातील खासदार आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी वर्षा निवासस्थानी पार पडली. या बैठकीत शिवसेना पक्षाकडून १८ जागांवर दावा करण्यात आल्याचं समजतेय.
शिवसेना खासदारांच्या बैठकीत या संदर्भात निर्णय एकमताने झाला. सन २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने २२ जागा जिंकल्या होत्या. त्यातील १८ जागांवर उमेदवार देण्याची शिवसेनेने तयारी सुरु केली आहे.याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे. उरलेल्या ४ जागांचे भविष्य ठरवण्याचे अधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याचा निर्णय शिवसेनेच्या संसदीय पक्षाने घेतला आहे.
या बैठकीत इतरही अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली असून या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी विशेष समिती बनविण्याचा निर्णयावरही शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. निवडणूक काळात करण्यात येणाऱ्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेली विकासाची कामे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे प्रमुख उद्दिष्टे असणार आहे.















Discussion about this post