मुंबई : केंद्र आणि राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरकारकडून अनेक सवलतीही दिल्या जातात, जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल. अशातच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली असून त्याचा फायदा करोडो शेतकऱ्यांना होणार आहे. सोबतच शेतकऱ्यांना याचा आर्थिक फायदा होणार आहे.
नेमकी काय घोषणा केली?
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी सरकारने नवीन आर्थिक योजना जाहीर केली आहे. याअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’ला मंजुरी देण्यात आली.
शेतकऱ्यांना रक्कम मिळेल
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ही रक्कम शेतकऱ्यांना केंद्राकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मिळणाऱ्या ६,००० रुपयांच्या व्यतिरिक्त असेल. याचा अर्थ शेतकरी पीएम सन्मान निधीचा लाभ घेऊ शकतील आणि राज्य सरकारकडून देण्यात येणारी आर्थिक मदतही वापरता येईल.
शेतकऱ्यांना फायदा
दुसरीकडे, या योजनेचा राज्यातील एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस राज्याचे अर्थमंत्रीही आहेत. मार्चमध्ये विधानसभेत सादर केलेल्या 2023-24 च्या अर्थसंकल्पात त्यांनी ही घोषणा केली. आता आगामी काळात शासनाच्या या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळू लागेल.
Discussion about this post