भुसावळ । थंडीमुळे भाजीपाल्याचे उत्पादन वाढल्यामुळे दर घटले. दुसरीकडे निर्वात खुली केल्याने कांद्याचे दर दुप्पटीने वाढले, यासोबत मागणीतील बाढ़ व उत्पादनातील घटीमुळे शेवगा व चळळीच्या शेंगा ८० ते १०० रुपये किलोवर पोहोचल्या आहेत. इतर पालेभाज्या व फळभाज्या मात्र ४० ते ६० रुपयांवर स्थिरावल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमान स्थिर आहे. मध्यंतरी त्यात काही अंशी वाढ झाली तरी भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला नाही.
त्यामुळे आवक स्थिर आहे. सध्या बाजारात पौष्टिक असलेल्या शेवगा शेंगा व चवळीच्या शेंगाचे दर ८० ते १०० रुपये किलोदरम्यान आहेत, मेथी, पोकळा, पालकचे दर ४० ते ६० रुपयांदरम्यान आहेत. गेल्या आठवड्यात कांद्याची निर्यात खुली केल्याने किरकोळ बाजारात कांद्याचे दर दुप्पटीने वाढले आहेत.
१० ते १२ रुपये किलोने विक्री होणारा कांदा आता २० ते २५ रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. केवळ कांदाच नव्हे तर पातीचे दरही ६० ते ७० रुपये झाले, टोमॅटो मात्र १५ ते २० रुपये किलोवर स्थिर आहे. दरम्यान, गेल्या महिनाभरात उसणाचे दर सुमारे चारशे रुपयांपर्यंत गेले होते. ते आता २५० ते ३०० रुपयांच्या दरम्यान स्थिरावले आहेत.
Discussion about this post