पुणे | निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. आयोगाच्या या निर्णयावर दोन्ही गटाकडून आणि इतर पक्षांकडूनही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. पण माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. शरद पवार काय भूमिका घेणार, काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. . आज तब्बल पाच दिवसानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की, बैलजोडीवर मी पहिली निवडणुकीवर लढलो. आमचं दोन वेळा चिन्ह गेलेलं आहे, चिन्ह मर्यादीत काळासाठी उपयुक्त असतं, असं सांगतानाच निवडणूक आयोगाचा निकाल आश्चर्यकारक आहे. निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष दुसऱ्याला दिला. ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्याला सोडून दुसऱ्याला पक्ष देण्यात आला. म्हणजे पक्षाचा अध्यक्ष असताना दुसऱ्याला पक्ष दिला गेला हे पहिल्यांदाच घडलं आहे. जनता या सर्व गोष्टींना समर्थन देणार नाही. सुप्रीम कोर्ट याबाबत योग्य तो निकाल देईल, असं शरद पवार म्हणाले.
मी निवडणूकच लढणार नाही
काही लोक भावनिक करून निवडणूक लढवतील. मते मागतील. त्यांच्या आवाहनाला बळी पडू नका, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. त्यावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी काही निवडणुकीला उभा राहणार नाही. त्यामुळे भावनात्मक बोलणं योग्य नाही. बारामतीची लोक चोखंदळ आहेत. बारामतीत केलेल्या कामाला लोकांनी पावती दिलेली आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.
Discussion about this post